परंडा– श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय,परंडा येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत इतिहास घडविला आहे.सख्ख्या दोन भावांनी एकाच स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करत महाविद्यालयासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे दि. २२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बी.कॉम.प्रथम वर्षाचा विद्यार्थी शनिराज निंबाळकर यांनी ६५ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.या विजयानंतर ते महाराष्ट्र चॅम्पियन ठरले असून त्यांना बुलेट गाडीचा मानही मिळाला आहे.
त्याचप्रमाणे,त्यांचे सख्खे बंधू व बी.ए.द्वितीय वर्षाचे विद्यार्थी रविराज निंबाळकर यांनी ९२ किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.दोन्ही भावांनी एकाच स्पर्धेत यश मिळवत महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव संजय (बप्पा) निंबाळकर,अध्यक्ष सुनील नाना शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव,उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने,स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे,कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे यांनी अभिनंदन केले. या दोन्ही खेळाडूंना शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव करत कौतुक केले. निंबाळकर बंधूंच्या या यशामुळे परंडा शहराचे नाव राज्यभर गाजले असून,भविष्यातही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
More Stories
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवी संधी,नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा – डॉ. सतीश कदम
रा.गे. शिंदे महाविद्यालयात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’; १२ आस्थापनांकडून ३१० पदांसाठी मुलाखती