कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) अंतर्गत संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत,कळंब तालुकाध्यक्षपदी भिमा हगारे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्षाचे धाराशिव निरीक्षक रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,जेष्ठ नेते जिवनराव गोरे, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा पाटील तसेच युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले भिमा हगारे हे प्रा.श्रीधर (बाबा) भवर यांच्या विचारांचे खंबीर शिलेदार म्हणून ओळखले जातात.त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत,सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कळंब तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसला नवे बळ मिळणार असून,आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.भिमा हगारे यांच्या नेतृत्वामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी लढा उभारला जाईल,असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. भिमा हगारे यांनी आपल्या निवडीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत,“सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अन्यायाविरुद्ध ठामपणे लढा देणार असून, पक्षाची विचारधारा गावागावात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहीन,”अशी प्रतिक्रिया दिली. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,कळंब तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात;ओम बहुउद्देशीय संस्थेकडून सत्कार .