August 9, 2026

जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश

  • परांडा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा)– नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा दि.२१ मार्च २०२६ रोजी क्रांती अकॅडमी,परांडा यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
    क्रांती अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कोकणे आणि फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ यांनी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते.
    या प्रसंगी राज्य समन्वयक मराठा क्रांती मूक मोर्चाचे आबासाहेब कापसे,प्रा.प्रदीप बंडगर,
    भाऊसाहेब मिसाळ,धम्मपाल सिद्ध,गणेश आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमादरम्यान दीपक ओव्हाळ यांनी क्रांती अकॅडमीचा प्रवास उलगडताना सांगितले की,“ही अकॅडमी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहे.येथून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.”
    प्रमुख पाहुणे डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या भाषणात दयानंद ढाले यांच्या निवडीचे कौतुक करत,
    “आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये बहुजन समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.त्या संधीचे आपण सोन कराल,”अशी अपेक्षा व्यक्त केली.
    कार्यक्रमाच्या शेवटी पांडुरंग कोकणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी क्रांती अकॅडमीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!