परंडा – परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या गठनासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास जाधव,उपाध्यक्षपदी नवनाथ गावडे तर सचिवपदी किरण बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक ज्येष्ठ नेते मोहनदादा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर समितीचा कार्यकाळ दि.११ एप्रिल २०२६ ते दि.०५ एप्रिल २०२७ असा निश्चित करण्यात आला असून,या कालावधीत महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, जनजागृतीपर कार्यक्रम,तसेच विविध विधायक उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे,वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे,फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा समन्वयक डॉ.अनंत देडगे,तालुका अध्यक्ष संतोष हिवरे,तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे,तालुका महासचिव राहुल पवार,उपाध्यक्ष शहाजी सोलनकर,शहराध्यक्ष किरण बनसोडे,तसेच इरशाद बागवान आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
सख्ख्या भावांची कमाल! महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा झेंडा उंचावला
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवी संधी,नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा – डॉ. सतीश कदम