कळंब – तालुक्यातील पाथर्डी येथील भूमिपुत्र सध्या पुणे येथे स्थायिक असणारे उद्योजक शरद सावंत यांना मराठवाडा युवा मंच पुणे यांच्या वतीने “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार पुणे येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग निगडी प्राधिकरण येथील सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला.सावंत हे गेल्या पंधरा वर्षांपासून पुणे येथे एसपीजी प्रोसेस इक्विपमेंट इंडिया या कंपनीचे मुख्य प्रवर्तक म्हणून कार्यरत असून त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक तरुणांच्या हाताला काम दिले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत मराठवाडा युवा मंच वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण इन्कम टॅक्स कमिशनर पुणे डॉ संतोष मानकोस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पुणे येथील पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे,जॉईंट डायरेक्टर एमपीसीबी मुंबई येथील सतीश पडवळ,पुणे येथील उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार,पुणे येथील जॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टी सुधीर शिंदे,जीएसटीचे सहाय्यक आयुक्त श्याम केंद्रे, मराठवाडा युवा मंचचे अध्यक्ष सत्यजित चौधरी,मराठवाडा युवा मंच सदस्य रामेश्वर गटकळ आदी उपस्थित होते ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हे सर्व वरिष्ठ अधिकारी मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत हे विशेष. सावंत यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील तसेच कळंब तालुक्यातील मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.त्यांना हा मराठवाड्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
More Stories
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर
अभंग संपदाचा देहू येथे भक्तिमय वातावरणात लोकार्पण सोहळा संपन्न
अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महाविकास आघाडीची भव्य बाईक रॅली – प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाचा हुंकार