पुणे – Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (बार्टी), येरवडा येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय महिला असेंब्ली पार पडली. People’s Action for Rural Awakening (PARA) आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनात राज्यभरातील महिला नेतृत्व सहभागी झाले. उद्घाटन सत्रात पंचशीला कुंभारकर यांनी असेंब्लीची भूमिका स्पष्ट केली.डॉ.देबजानी साहू यांनी तळागाळातील नेतृत्वनिर्मिती व राज्यस्तरीय नेटवर्किंगची गरज अधोरेखित केली. समाजकल्याण विभागाच्या आयुक्त सौ.दीपा मुधोळ मुंडे यांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या ११७ योजनांची माहिती दिली. शिष्यवृत्ती,वसतिगृहे,उद्योजकता विकास,कौशल्य प्रशिक्षण आदी योजनांचा लाभ पात्र घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला नेतृत्वाने पुढाकार घ्यावा,असे त्यांनी सांगितले. बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांनी प्रशिक्षण व नेतृत्व विकास उपक्रमांची माहिती दिली.विषयाधारित सत्रांत दलित व आदिवासी महिलांवरील अत्याचार,जमीन हक्क,आर्थिक न्याय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिलांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,तक्रार नोंदणी प्रक्रिया व न्यायप्रक्रियेतील अडचणी यावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी संघटनात्मक बांधणी,आर्थिक पारदर्शकता, दस्तऐवजीकरण व ॲडव्होकेसी रणनीतीवर मार्गदर्शन करण्यात आले.माध्यमांशी समन्वय, न्यायालयीन हस्तक्षेप आणि पुराव्याधारित लढ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गावपातळीवर महिला समित्या स्थापन करून अत्याचारविरोधी तत्काळ प्रतिसाद गट उभारण्याचा आराखडा सादर करण्यात आला. या दोन दिवसीय अधिवेशनात सुमारे १५० महिला व ५० हून अधिक पुरुष सहभागी झाले. समारोपावेळी अन्यायाविरुद्ध संघटित व कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
More Stories
अभंग संपदाचा देहू येथे भक्तिमय वातावरणात लोकार्पण सोहळा संपन्न
अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महाविकास आघाडीची भव्य बाईक रॅली – प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाचा हुंकार
पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा उघड! पीडित दलित शेतकऱ्यांची ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे धाव