पुणे – गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुण्यातील कर्तृत्ववान महिलांचा जनजागृती सेवा संस्था, ठाणे-बदलापूर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.नऱ्हे रोड, धायरी फाटा येथील कै.सौ.शालन शिवराम चव्हाण सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित या कार्यक्रमात शिक्षण,साहित्य,कला,उद्योग, वैद्यकीय,कायदा,क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा शाल,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांनी स्त्री सक्षमीकरण,समानता आणि महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत प्रेरणादायी विचार मांडले. महिलांनी स्वबळावर प्रगती करत समाजात सकारात्मक बदल घडवावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संचालन संचिता भंडारी यांनी केले तर आभार महेश्वर तेटांबे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
More Stories
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर