September 24, 2026

ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • मोहा – येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ मार्च २०२६,गुरुवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची कृतज्ञतेने आठवण करण्यात आली.
    ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख यावेळी उपस्थितांनी केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच मराठवाड्यात शिक्षणाची चळवळ बळकट झाली असून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली,असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
    याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. सुनील साबळे,प्रा.रोहित मोहेकर,प्रा.देवदत्त पाटील,प्रा. दिग्विजय पाटील,संजय आडने, जनार्दन भामरे,अमित कुमार शर्मा यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
error: Content is protected !!