March 4, 2026

जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सोपान पवार सन्मानित

कळंब – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख, नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रुती वडगबाळकर,प्रमुख अतिथी किशोर चंडक प्रसिद्ध उद्योजक,सौ.आरती काळे,गुलाबराव पाटील,अवधूत म्हमाने,अशोक खानापुरे,सुनील पुजारी,डॉ.रामचंद्र धर्मसाले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,साने गुरुजी यांची प्रतिमा,श्यामची आई पुस्तक देऊन सोपान पवार यांना सन्मानित करण्यात आले.सोपान पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी,गुणवत्ता वाढीसाठी,अध्यापन कार्याबरोबर प्रशालेत सामान्य ज्ञान स्पर्धा, कथालेखन स्पर्धा,भाषण स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ,विविध विषयावर एकूण 25 नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत.त्यापैकी 5 उपक्रम महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हास्तर,राज्यस्तरावर निवड झालेली आहे पारितोषिके त्यांना मिळालेले आहेत.तसेच मराठी विषयाचे जिल्हास्तर,राज्यस्तर, तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे.तसेच अविरत राज्यस्तर, जिल्हास्तर मास्टर ट्रेनर म्हणून कार्य केले आहे.सामान्य ज्ञान स्पर्धा या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय साने गुरुजी कथामला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला धाराशिव जिल्हाध्यक्ष अध्यक्ष डॉ.गिरीश कुलकर्णी,धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुरेश काका टेकाळे,प्राचार्य महादेव गपाट,प्रदीप यादव,चेवले सर, हरिश्चंद्र अवताडे तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा कळंबचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले .

error: Content is protected !!