February 20, 2026

लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

  • स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
  • लातूर – शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी छत्रपतींच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य संकल्पनेची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
    इ.स.१६७४ मध्ये रायगड किल्ला येथे राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत स्थापना केली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सक्षम व सुबक प्रशासन उभारले.किल्ल्यांचे सुदृढ जाळे, शिस्तबद्ध लष्कर,गनिमी काव्याची रणनिती आणि सक्षम आरमार उभारणीद्वारे त्यांनी स्वराज्य सुरक्षित,संघटित व स्वाभिमानी केले.महसूल व्यवस्था,लष्करी संघटन आणि स्थानिक प्रशासनातील त्यांच्या सुधारणांमुळे जनतेला न्याय व संरक्षण मिळाले.
    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीसन्मान,धार्मिक सहिष्णुता आणि सर्वसमावेशक शासनपद्धतीचा आदर्श घालून दिला.त्यांच्या नेतृत्वातून स्वराज्य, शिस्त,धैर्य आणि प्रभावी शासनव्यवस्थेचा आदर्श पुढील पिढ्यांसमोर उभा राहिला. त्यांच्या कार्यातून देशभक्ती, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचा संदेश समाजाला मिळत राहील, असा विश्वास यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष
    सुशीलकुमार चिकटे यांनी व्यक्त केला.
    या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष सुशील कुमार महादेव चिकटे तसेच बाबासाहेब कांबळे, रामभाऊ कोरडे,विनोद कोल्हे, वैभव गायकवाड,विजय चौधरी, सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!