धाराशिव – उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने ॲड.गुंड, काळे,घोलप,पवार,सुर्यवंशी, सोनवणे यांचा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,पुरस्कार समितीचे समन्वयक गणेश शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने दि.१९ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. धाराशिव शहरातील पवन राजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड.व्यंकटराव गुंड,कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथील व सध्या पुणे स्थित असलेले सतिश काळे,वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील विजयकुमार घोलप, लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील गोविंद पवार, उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील अस्मिता सुर्यवंशी व धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ असे आहे.नितीन गरड,जगदीश शिंदे, संपादक राजेंद्र बहिरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ. कैलास पाटील यांच्यासह इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह:विविध उपक्रम
गॅस टंचाईविरोधात ‘चूल मांडून’ अनोखे आंदोलन;वंचित बहुजन आघाडीचा धाराशिवात इशारा
श्रद्धेला प्रश्न विचारणे हेही मूलभूत कर्तव्य — ॲड.असीम सरोदे