अपसिंगा – भारत स्काऊट्स आणि गाईड्स यांच्या वतीने अपसिंगा येथे आयोजित स्काऊट-गाईड शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात घेण्यात आलेल्या हस्तकौशल्य स्पर्धेत ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य सादर करत उल्लेखनीय यश संपादन केले. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या कल्पकता,सर्जनशीलता व बारकाईने सादर केलेल्या हस्तकलेमुळे परीक्षकांची विशेष दाद मिळाली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागेश मापारी (जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्रा.,जि.प. धाराशिव), कैलास पिंपळे (जिल्हा आयुक्त स्काऊट तथा उपशिक्षणाधिकारी प्रा., जि.प. धाराशिव), अजय अर्जे (जिल्हा चिटणीस, भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय, धाराशिव), शिवाजी सांगळकर (अध्यक्ष, नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ, अपसिंगा), विजय भोसलें (कोषाध्यक्ष, नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ, अपसिंगा), दिलीप चौधरी (जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट तथा मेळावा प्रमुख),श्रीमती सुधा साळुंके (जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी माध्य., जि.प. धाराशिव), दत्तात्रय लांडे (जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी माध्य., जि.प. धाराशिव), विवेक कुंभार (जिल्हा संघटक स्काऊट, भारत स्काऊट्स आणि गाईड्स, धाराशिव), शंकर बोरे (सचिव, नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ, अपसिंगा तसेच मेळावा संयोजक), जयसिंह सुर्यवंशी (मुख्याध्यापक,नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अपसिंगा),श्रीमती जयमाला वटणे (गाईड कॅप्टन तथा मेळावा प्रमुख गाईड) व श्रीमती सविता पाटील (जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड,भारत स्काऊट्स आणि गाईड्स, धाराशिव) उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक सहशिक्षिका नीता सोनवणे यांचे अभिनंदन करताना प्राचार्य अविनाश मोरे यांनी या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे, अशा भावना व्यक्त केल्या. विजेत्या विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन