September 20, 2026

डॉ.संतोष मडके यांचा साक्षी पावनज्योतच्या वतीने कर्तृत्वाचा गौरव

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अग्रो इंडस्ट्रीज,मोहा येथे उल्लेखनीय कार्य सुरू आहे.
    या उद्योगाच्या यशस्वी वाटचालीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष मडके हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
    त्यांच्या या सेवाभावी व कार्यक्षम नेतृत्वाबद्दल शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा विशेष अंक दि.१२ जानेवारी २०२६,सोमवार रोजी मुख्य संपादक सुभाष घोडके यांच्या हस्ते देऊन त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.
    या प्रसंगी कार्यकारी संपादक अविनाश घोडके,तसेच कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!