मोहा – सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार विद्यालयाचे प्रा.शेखर गिरी यांनी आपल्या प्रभावी व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने विशेष गाजवला. गझल कट्ट्यावर एकूण १८ मुशायरे सादर झाले असून या मुशायऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून सुमारे २०० गझलकारांनी सहभाग नोंदवला. प्रा.शेखर गिरी यांनी पहिल्याच मुशायऱ्याचे सूत्रसंचालन करत गझल कट्ट्यावर रंग भरले.सर्वच मुशायऱ्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.याचबरोबर प्रा. गिरी यांनी गझल कट्ट्यावरील गझलांच्या निवड समितीमध्ये परीक्षक म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते गझलकार प्रा.शेखर गिरी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्रा. सुनील साबळे तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना प्रा.शेखर गिरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना साहित्य,संस्कृती व सृजनशीलतेचे महत्त्व विशद करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राहुल भिसे यांनी केले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन