February 8, 2026

विद्या मंदिर हायस्कूल,आष्टा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या मंदिर हायस्कूल,आष्टा (ता. भूम) येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ वार शनिवार रोजी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके, सहाय्यक शिक्षक अनंत्रे एन.बी., मांजरे एस.ए.,संघपाल सोनकांबळे,तसेच श्रीमती निर्मला वाघमारे,सुजित कुमार जाधव, बबन यादव यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक मांजरे यांनी केले. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा,स्त्री शिक्षणातील योगदानाचा आणि बालिका दिनाच्या महत्त्वाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे भाषण करीत त्यांना विनम्र अभिवादन केले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!