March 26, 2026

महिलामुक्ती दिन व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त १००० प्रतिमांचे वितरण

  • कळंब – ३ जानेवारी महिलामुक्ती दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पावन दिनाचे औचित्य साधून,स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन म्हणून त्यांच्या १००० प्रतिमांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, हासेगाव यांच्या वतीने करण्यात आली असून,संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनीताई राऊत यांच्या पुढाकारातून आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
    डॉ.सरोजिनीताई राऊत यांनी मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेत विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर सातत्याने कार्य केले आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गोशाळा संघटन,विविध कौशल्याधारित उपक्रमांचे आयोजन,तसेच कळंब–धाराशिव मतदारसंघातील गावांमध्ये पर्यटन विकास,पायाभूत सुविधा उभारणी,बसस्थानक निर्मिती, अल्पसंख्याक विकास,मुख्यमंत्री सहाय्यता निधी,तांडा वस्ती सुधारणा योजना,रस्ते व शेतरस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
    संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘गाव तिथे टाकी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात २ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. यासोबतच नमो चषक व डे–नाईट क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजनही करण्यात आले आहे.
    सावित्रीबाई फुले प्रतिमा वाटप उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, तो स्त्री सन्मान, शिक्षण व महिलामुक्तीचा जागर ठरला. सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत प्रत्येक मुलीच्या आयुष्यात शिक्षणाचा उजेड पसरावा, सक्षम महिला – सक्षम कुटुंब ही संकल्पना रुजावी, तसेच शिक्षणाचे महत्त्व व सावित्रीबाईंचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
error: Content is protected !!