February 8, 2026

आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना श्रद्धापूर्वक अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    प्रशालेच्या गणित विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका शशिकांत मांजरे यांच्या हस्ते प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
    यावेळी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्यासह सहशिक्षक नामदेव अंत्रे,शशिकांत मांजरे, संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे, सुजितकुमार जाधव,बबन यादव तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    कार्यक्रमात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!