March 26, 2026

विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची उपस्थितांनी आठवण करून दिली.त्यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!