आष्टा – दिनांक ०६ डिसेंबर २०२५,शनिवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने,तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे संविधानाचे शिल्पकार,विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे ज्येष्ठ गणित शिक्षक शशिकांत मांजरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत डॉ.बाबासाहेबांविषयी कृतज्ञता, समता,शिक्षण व संविधान मूल्यांची जाणीव व्यक्त केली. या अभिवादन सोहळ्यास मुख्याध्यापक आनंद रामटेके, सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका सौ. निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वरूप साधे, संयत व मूल्याधारित असे ठेवण्यात आले होते.
More Stories
ग्रामीण भागात ज्ञानदीप पेटवणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन