कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.६ डिसेंबर २०२५ वार शनिवार रोजी प्रतीवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभाग व राष्ट्र सेवा योजना (रासेयो) यांच्या संयुक्त विद्यमाने जगाला अहिंसा,सत्य,सहिष्णुता आणि मानवतावादाचे धडे देणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. हा उपक्रम ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनातून पार पडला.
यानंतर उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी आंबेडकरी तत्त्वज्ञान, सामाजिक परिवर्तनासाठी केलेले बाबासाहेबांचे योगदान, तसेच भारतीय संविधानाचे मूल्य यावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमास रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. व्ही. ताटीपामूल, प्रा. नितीन अंकुशराव, प्रा. डॉ. चांदोरे, प्रा. डॉ. दत्ता साकोळे, डॉ. श्रीकांत भोसले, प्रा. विलास आडसुळ, प्रा. अक्षय खंडाळे, प्रा. जे. एच. काझी, प्रा. सरस्वती बोंदर यांची उपस्थिती लाभली.
उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अधीक्षक हनुमंत जाधव,ग्रंथपाल प्रा.डॉ.अनिल फाटक,अरविंद शिंदे, संतोष मोरे,कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन