कळंब – कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ची प्रक्रिया सुरू असून दिनांक १८ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून नगरसेवक पदासाठी ९४ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध तर ६६ अर्ज अवैध ठरले. छाननीमध्ये अवैध ठरलेले अर्ज प्रामुख्याने पुढील कारणांमुळे अवैध घोषित करण्यात आले — अर्जावर सूचकाची सही नसणे, उमेदवाराचा मतदार यादीतील क्रमांक नसणे,नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवाराच्या दुय्यम/डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रावरही एकच सूचक असणे. तसेच दोन पक्षांत जागा वाटप समझोत्यात ऐनवेळी बदल केल्याने नामनिर्देशन पत्रावर एका पक्षाचे चिन्ह व ए–बी फॉर्म मात्र मित्र पक्षाचा असा प्रकारही उघड झाला. प्रभाग क्र.४-ब मधील शिवसेना उमेदवार संगीता संजय घुले यांचे नामनिर्देशन पत्र त्यांच्या पती संजय घुले यांची नोंद कंत्राटदार असल्याचे कारण दाखवून अवैध ठरविण्यात आले.या निर्णयाविरोधात उमेदवारांनी अपीलात जाण्याचा निर्णय घेतला आहे.संजय घुले यांनी, “कंत्राटाची मागणी केली होती; प्रत्यक्षात कुठेही कंत्राटदार म्हणून काम केलेले नाही,”अशी आपली बाजू मांडली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असून नगरसेवकांसाठी प्रत्येक प्रभागातून अ व ब अशा दोन जागांसाठी एकूण २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
प्रभागनिहाय वैध ठरलेले उमेदवार हे पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग १ – अ: ३,ब: ५,प्रभाग २ – अ: ३, ब: ७,प्रभाग ३ – अ: ३, ब: ९,प्रभाग ४ – अ: ६, ब: ३,प्रभाग ५ – अ: ३, ब: ४,प्रभाग ६ – अ: ३, ब: ४,प्रभाग ७ – अ: २, ब: ६,प्रभाग ८ – अ: ६, ब: १०,प्रभाग ९ – अ: ३, ब: ४,प्रभाग १० – अ: ४, ब: ६,दिनांक २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येतील. न्यायालयीन अपील झाल्यास व त्यावर सुनावणी झाल्यानंतर २४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत राहील. कळंब नगरपरिषदेसाठी विधीमान्य नामनिर्देशन केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची यादी ही पुढीलप्रमाणे आहेत. कापसे राणी उर्फ सुनंदा शिवाजी,खान अमरीन जावेद,गोरे कविता निवृत्ती,चोंदे मीराबाई भागवत,बनसोडे मनीषा सतपाल,भवर मिनाक्षी श्रीधर,मुंदडा रश्मी संजय,शेख शेहनाज अनीस,सपाटे ज्योती प्रकाश
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव