कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने, तसेच मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे पक्षी संवर्धन सप्ताहानिमित्त एक आगळावेगळा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेतील नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांनी पक्षी निरीक्षण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व प्रख्यात पक्षी अभ्यासक डॉ.सलीम अली यांच्या साहित्याचा आधार घेत विद्यार्थ्यांना पक्षी विज्ञानाची प्रेरणादायी माहिती देण्यात आली. विविध पक्ष्यांचे रंग,आकार, आहार,राहणीमान,हालचाली व आवाज या सर्व बाबींचे निरीक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन पवार सरांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांना स्वतः निरीक्षण करून त्यावर टिपणे लिहिण्याची प्रेरणा दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील विविध पक्ष्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली.निसर्गाबद्दलची आवड,पर्यावरण जाणीव व लेखनकौशल्य विकसित होण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमाचे मुख्याध्यापक व्ही. जी.कुंभार,पर्यवेक्षक जे.एन. कोळी यांनी कौतुक करून शिक्षक सोपान पवार यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी संदीप पाटील यांचीही उपस्थिती होती. प्रशालेत राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून,पवार सरांच्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले आहे.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव