August 8, 2025

ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी स्वप्निल कांबळे

  • बारामती – ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी साप्ताहिक बारामती समाचार वृत्तपत्राचे संपादक स्वप्निल कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
    या अगोदर पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्याच प्रामाणिक कामाची दखल घेत संस्थापक अध्यक्ष करण बौद्ध यांनी ही नियुक्ती केली आहे.
    कांबळे हे गेल्या आठ – नऊ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक पत्रकारिता करत कायम लोकांचे प्रश्न,समस्यांची आणि अडीअडचणींची प्राथमिकता ओळखून जबाबदारीने काम करत आहे.
    ऑल इंडिया संपादक संघाचे देशाच्या १० राज्यात तर महाराष्ट्रात एकूण २१ जिल्ह्यात संघटन आहे. त्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना एकत्र घेऊन पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांच्या न्याय- हक्कासाठी मी काम करणार असून ऑल इंडिया संपादक संघाचे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी ही माझी प्राथमिकता असुन ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहील. असे निवडीनंतर स्वप्निल कांबळे यांनी सांगितले.
error: Content is protected !!