August 8, 2025

मोहेकर महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जागतिक एडस दिनानिमित्त एड्स जनजागृतीची शपथ डॉ. संदीप महाजन यांनी दिली. जागतिक एडस दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला डॉ .रामकृष्ण लोंढे इंडियन मेडिकल असोशियन कळंबचे माजी अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले .ही एड्स जनजागृती रॅली कळंब शहरातून काढण्यात आली. डॉ. लोंढे यांनी विद्यार्थ्यांना एड्स बद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, डॉ. मीनाक्षी जाधव, डॉ. नागनाथ अदाटे, संदीप सूर्यवंशी, अभिमन्यू हाके व डॉ. स्वप्निल शिंदे, प्रा .कळसकर, श्रीमती प्रगती भंडारी, परशुराम कोळी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईश्वर भोसले, आरोग्य सेवक मुंजाशी शिकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेकत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!