धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 72 कारवाया करुन 55,300 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)बालिका बापु पवार, वय 35 वर्षे, रा. वरुडा पारधी पिढी ता. जि. धाराशिव या दि.30.11.2023 रोजी 18.30 वा. सु. उपळा ते तेर जाणारे रोडवर किरण कालीदास पडवळ यांचे शेतात अंदाजे 920 ₹ किंमतीची 15लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)संतोष शंकर पवार, वय 32 वर्षे, रा. वडर गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 17.15 वा. सु. येडेश्वरी मंदीर येथील उकडगाव रोडवर अंदाजे 5,000 ₹ किंमतीची 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)भारत वसंत शिंदे, वय 60 वर्षे, रा. बामणी ता. जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 11.20 वा. सु. बामणी येथे बेंबळी जाणारे रोडचे उत्तर बाजूस अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 1)प्रभु गणपती राठोड, वय 59 वर्षे, रा. समुद्रवाणी तांडा ता. जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 17.15 वा. सु. हॉटेल प्रियल च्या बाजूस समुद्रवाणी शिवार येथे अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)राम यशवंत गायकवाड, वय 53 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 14.00 वा. सु. येणेगुर येथे अंदाजे 1,100 ₹ किंमतीची 11 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 1)देवु धुळाप्पा हावळे, वय 50 वर्षे, रा.भिमनगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 18.30 वा. सु. भिमनगर मुरुम येथे आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,400 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 13.20 वा. सु. कळंब पो. ठा.कळंब शहरातील आठवडी बाजार मैदान येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सलीम इब्राहिम बागवान, वय 30 वर्षे, रा. गांधीनगर पुनर्वसन सावरगावता. कळंब जि. धाराशिव हे 13.20 वा. सु. कळंब शहरातील आठवडी बाजार मैदान येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 13.50 वा. सु. वाशी पो. ठा.हद्दीत वाशी येथील पारा चौकातील पान टपरी समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आकाश सुधाकर जाधव, वय 29 वर्षे, रा. आर्दश नगर वाशी, ता. वाशी जि. धाराशिव हे 13.50 वा. सु. वाशी येथील पारा चौकातील पान टपरी समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 13.40 वा. सु. उमरगा पो. ठा.हद्दीत कुन्हाळी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)खंडापृपा तुकाराम बडुले, वय 26 वर्षे, रा. कुन्हाळी ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.40 वा. सु. कुन्हाळी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 910 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 16.30 वा. सु. भुम पो. ठा.हद्दीत आठवडी बाजारात पाण्याचे टाकी खाली भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)संजय दत्ता चव्हाण, वय 53 वर्षे, रा. आरसोली ता. भुम जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. आठवडी बाजारात पाण्याचे टाकी खाली भुम येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,610 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 17.00 वा. सु. तुळजापूर पो. ठा.हद्दीत आर्य चौक गणेश पान स्टॉल समोर तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)समाधान सात्ताप्पा कदम, वय 25 वर्षे, रा. चिंचोली, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. आर्य चौक गणेश पान स्टॉल समोर तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 16.10 ते 17.20 वा. सु. ढोकी पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)रेवणसिध्द विठृठल आकोसकर, वय 46 वर्षे, रा. काळेवाडी, 2) सोमनाथ धोंडीराम वाधमारे, वय 32 वर्षे, रा. रामवाडी, 3) अगतराव भिमराव गोरे, वय 41 वर्षे, रा. गोरेवाडी, 4)सुरेश राम कोळी, वय 47 वर्षे, रा. कोळेवाडी, 5) काका मारुती देवकते, वय 39 वर्षे, 6) महादेव अर्जुन शेळके, वय 40 वर्षे, 7) भागवत प्रभाकर भक्ते, वय 47 वर्षे, तिघे रा. तेर ता. जि. धाराशिव हे सर्वजन 16.10 वा. सु.कोळेवाडी शिवारातील रेवनसिध्द अकोसकर यांचे शेता लगत बाभळीचे झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी तिरट जुगाराचे साहित्यासह एकुण 6,500 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 1)बालाजी जिन्नस शिरगिरे, वय 41 वर्षे, रा.पंप हाउस समोर तेर ता. जि. धाराशिव हे 17.20 वा. सु.तेर येथील सुर्या हॉटेलचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,100 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.30.11.2023 रोजी 19.30 ते 20.46 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)राहुल जालींदर जाधव, वय 34 वर्षे, रा.इंगळे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु.धाराशिव धारासुर मर्दीनी कमानीजवळ मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,380 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 1)गोपाळ तानाजी विधाते, वय 25 वर्षे, रा.तेरणा इंजिनीअरींग कॉलेज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे 20.46 वा. सु.अण्णाभाउ साठे चौक ते खॉजा नगर कडे जाणारे रस्त्यालगत मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 840 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)बालाजी रघुवीर, वय 44 वर्षे, रा. माने नगर उमरगा ता. जि. धाराशिव यांनी दि.30.11.2023 रोजी 13.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र एमएच 25 ई 9168 हा एनएच 65 रोडवर बसस्थानक समोरील बाजूस सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) ज्ञानेश्वर सोपान गिते, 2) श्रीरंग ज्ञानोबा गिते, 3) अशोक केशव चव्हाण तिघे रा. आद्रुंड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.27.11.2023 रोजी 22.00 वा. सु. भगवान भोईटे यांचे घराजवळ ईट जातेगाव रोडवर आद्रुंड येथे फिर्यादी नामे-सिध्देश्वर सदाशिव लिमकर, वय 43 वर्षे, रा. आद्रुंड ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने राजकारणाच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सिध्देश्वर सदाशिव लिमकर यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 307, 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) उमेश गणपत शिनगारे, रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर 2) शिवानंद (पुर्ण नाव माहित नाही) रा. सावरगाव, ता. तुळजापूर व इतर अनोळखी दोन इसम यांनी दि.30.11.2023 रोजी 15.00 वा. सु. वाणेवाडी येथे शेत गट नं 160 मध्ये फिर्यादी नामे-सागर राजेंद्र काटकर, वय 28 वर्षे, रा. वाणेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बांधावरील गवत काढण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सागर काटकर यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी मयत नामे- रणजित उत्तमराव भोसले, वय 60 वर्षे, गावसुद ता. जि. धाराशिव हे दि.05.11.2023 रोजी 22.00 वा. सु. गणेश नगर के.के. हॉस्पीटल धाराशिव समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 0927 ही वर बसून जात होते. दरम्यान रणजित भोसले यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवुन रोडवर अचानक डुक्कर आडवे येवून आरोपी मयत यांनी अचानक बे्रक मारुन डुक्करला धडक लागून डिव्हासडरवर पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रताप उत्तमराव भोसले, वय 55 वर्षे रा. गावसुद ता. जि. धाराशिव यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
तुळजापूर पोलीस ठाणे : मयत नामे- सतीश गंगाराम कदम, वय 73 वर्षे, रा. भगवती विहीरीजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी 13.33 ते दि. 25.11.2023 रोजी 14.00 वा. सु. विषारी गोळ्या घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- 1) किसन भाउराव डोंगरे, 2) गणेश उर्फ गणराज किसन डोंगरे, 3) नागेश सिन डोंगरे सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत सतीश कदम व त्यांच्या मुलाची भेट घेवून एकत्रित घेतलेल्या जमिनीवर प्लॉट विक्रीच्या संमती पत्रावर सध्या सही करा असे म्हणून मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून सतीश कदम यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- प्रसाद सतिश कदम, वय 30 वर्षे, रा. भगवती विहीरीजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे
“जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे हस्ते चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत मालमत्ता मुळ मालकांस परत.” धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेला माल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकां मार्फत जप्त केला जातो व मुळ मालकांना- फिर्यादींना स्वाधीन केला जातो. गेल्या एक वर्षापासुन धाराशिव जिल्हा पोलिसांनी वाशी पो.ठा.च्या 1, उस्मानाबाद ग्रामीण 1, कळंब 3, तुळजापूर 3, नळदुर्ग 1, तामलवाडी 1, बेंबळी 1,आनंदनगर 2, लोहारा 1, मुरुम 1 अशा 19 गुन्ह्यातील जप्त केलेल्या 17 मोटारसायकल, 02 ट्रॅक्टर, 02 मोबाईल फोन, व 45.89 ग्रॅम सुवर्ण दागिणे असा एकुण 23,99,889 ₹ किंमतीचा मुद्देमाल हा आज दि.01.12.2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृह येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकांना- फिर्यादींना परत करण्यात आला. आपले चोरीला गेलेला मौल्यवान एैवज- मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल या प्रसंगी मालमत्ता धारकांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.
तसेच सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोहर हसन, पोलीस उपअधीक्षक श्री. सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सपोनि श्री. शैलेश पवार, श्री. कासार, पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच मुळ मालक उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला