परंडा— श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव संचलित शिक्षण महर्षी रा.गे.शिंदे महाविद्यालय,परंडा येथे दि.३१ ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार रोजी भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ. शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, शिक्षकेतर कर्मचारी संतोष राऊत, अजित घुमरे,माजी ग्रंथालय परिचर बबन ब्रह्मराक्षस,उत्तम माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.जयंतीनिमित्त उपस्थितांनी सरदार पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून राष्ट्रीय एकता,संघटन आणि देशभक्तीचा संदेश दिला.
More Stories
सख्ख्या भावांची कमाल! महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा झेंडा उंचावला
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवी संधी,नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा – डॉ. सतीश कदम