कळंब – अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व संसारोपयोगी साहित्याच्या मोठ्या नुकसानीची दखल घेत श्री दत्तसाई मंदिर ट्रस्ट, वाठवडा आणि ज्येष्ठ नागरिक महासंघ,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावनेतून “एक हात मदतीचा,एक हात कर्तव्याचा” या संकल्पनेखाली दि.३१ ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार रोजी पूरग्रस्त व गरजू नागरिकांना किराणा किट आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे ठाणे-मुंबई अध्यक्ष अण्णासाहेब शहाजी टेकाळे, त्यांचे बंधू शिवाजी शहाजी टेकाळे,व श्री दत्तसाई मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. शुशिलाताई टेकाळे यांनी केले. वाठवडा येथे ४०० किराणा किट आणि साड्यांचे वाटप करण्यात आले,तर कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालकाश्रमाला २५ किट देण्यात आले.सध्या आश्रमात मुले नसल्याने महादेव महाराज अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तू कळंब शहरातील अनाथ, अपंग आणि असहाय नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत माजी उपसभापती ॲड.दिलीपसिंह देशमुख,स्वप्नपूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल माने, ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, लक्ष्मण अडसूळ,अच्युतराव माने, बाबुराव पौळ,शरद खंदारे, सेवानिवृत्त शिक्षक मधुकर शीलवंत,यशवंत हौसलमल, हनुमंत पाटुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव महाराज अडसूळ यांनी केले, सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार सचिन क्षिरसागर यांनी मानले. हा उपक्रम समाजसेवेचे उत्तम उदाहरण ठरला असून,उपस्थित मान्यवरांनी ट्रस्ट व महासंघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार