प्राचार्य डॉ.सुधीरजी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न
पुणे (वारजे) – धाराशिवचे ज्येष्ठ साहित्यिक गणेशराव शिंदे संपादित दिवाळी विशेषांक “दखल” चे प्रकाशन पुण्यातील पुणेरी कळंबकर ग्रुप च्या वतीने प्राचार्य डॉ.सुधीरजी कुलकर्णी (सिंहगड कॉलेज) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रकाशनाचा हा सोहळा राजेश नाना काटे पाटील कळंबकर यांच्या वारजे येथील निवासस्थानी उत्साहात पार पडला. या प्रसंगी डावी कडून सर्वश्री गोविंदराव देशमुख,बळवंतराव दशरथ,शरदराव देशमुख, मुकुंदराव पानसे,गो.गो.कुलकर्णी, जगदिशराव कुलकर्णी,डॉ. सुधीरजी कुलकर्णी,सुहासप्पा भडंगे,राजेश नाना काटे पाटील कळंबकर,तसेच ग्रुपचे ॲडमिन रविंद्रजी कुलकर्णी (कन्हेरवाडीकर) हे उपस्थित होते. अचानक आलेल्या पावसामुळे उपस्थितीवर थोडा परिणाम झाला असला तरीही कार्यक्रम आनंदात व साहित्यिक वातावरणात पार पडला.
More Stories
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर