कळंब – शहरातील नागरी सुविधांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.मंजूषा गुरमे यांना दि.२७ ऑक्टोबर २०२५ वार सोमवार रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात पाणीपुरवठा योजना, ईदगाह मैदान विकास,शहर स्वच्छता मोहीम,पुनर्वसन क्षेत्रातील धार्मिक स्थळांना तिर्थक्षेत्र दर्जा,तसेच ऐतिहासिक शिल्प स्तंभ उभारणी या पाच महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की — या मागण्या २ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण न झाल्यास नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष व निवडणूक प्रभारी संजय मुंदडा, शहरप्रमुख विश्वजीत जाधव,प्रा. संजय कांबळे,शामनाना खबाले, मोहसीनदादा मिर्झा,इम्रान सय्यद, सुधीर भवर,शंकर वाघमारे,डॉ. रुपेश कवडे आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी