September 21, 2026

माने दांपत्यास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप:मावळत्या सूर्याच्या साक्षीने एकाच चितेवर अंत्यसंस्कार

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा.डॉ. रामराव आत्माराम माने (वय ७३) आणि त्यांची पत्नी,हायकोर्टातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड.रत्नमाला साळुंके–माने यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी रुईभर (जि. धाराशिव) येथे मावळत्या सूर्याच्या साक्षीने एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
    शनिवारी (दि.२५) संध्याकाळी झालेल्या अपघातात या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.रविवारी सकाळी नित्यानंद पार्क,मिटमिटा (औरंगाबाद) येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी भाविक, विद्यार्थी व सहकाऱ्यांची गर्दी झाली होती.
    रुईभर येथे अंत्यसंस्कारावेळी परिसर शोकाकुल झाला होता.या वेळी माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड,प्राचार्य रमेश दापके, प्रा.ए.आर.पाटील,अनिल काळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम आदींनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
error: Content is protected !!