वाशी – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाडा–हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक युवराज सावंत, शालेय समितीचे अध्यक्ष पंडितराव कोल्हे,सदस्य दिलीपराव कुलकर्णी व शिवाजीराव सुकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहणाचा मान मुख्याध्यापक सावंत यांना मिळाला.राष्ट्रध्वजाला वंदन करताना “जन गण मन” हे राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत व मराठवाडा गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. प्रशालेचे सहशिक्षक संतोष बोडके यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर उलगडले.त्यानंतर स्वच्छतेची प्रतिज्ञा सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,उपस्थित मान्यवर,पालक व ग्रामस्थ यांनी घेतली. या दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठवाड्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा स्पष्ट केली.मराठवाडा ही संतांची भूमी असून येथे आद्यकवी मुकुंदराज,चक्रधर स्वामी,संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत एकनाथ, संत जनाबाई यांसारख्या संतांनी सामाजिक व आध्यात्मिक दिशा दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पत्रकार शिवराम शिंदे व एल. आर. फुरडे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यार्थ्यांची तहान भागवली! शिवम बोअरवेल कन्हेरवाडीची निस्वार्थ सेवा; बंद बोअरवेल मोफत दुरुस्त
संभाजी विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी