August 8, 2025

यमाई देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

गोविंदपूर ( अविनाश सावंत यांजकडून ) –
कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील जागृत देवस्थान श्री यमाई देवी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
दोन दिवशीय महोत्सवात विविध धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील ग्रामदैवत यमाई देवीच्या महोत्सव प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तिकी शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देवीची आराधना व विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त ग्रामस्थांनी एकास एक अशा सात बैलगाड्या जोडून माणसे भरून ओढण्याचा कार्यक्रम सोमवारी (दि.२७) सायंकाळी ४ः३० ते ५:३० या कालावधीत पार पडला.
परिसरातील महिला व पुरुषांनी हा चित्त थरारक अंगावर शहारे आणणारा कार्यक्रम अनुभवला. तसेच सायंकाळी देवीचा छबिना सोंगे तसेच लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला मंगळवारी (दि.२८) सकाळी हजेरीचा व दुपारी सोंगाचा कार्यक्रम सायं. ४ः00 वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम पार पडला.
यात्रा महोत्सव यशस्वीतेसाठी गोविंदपुर यात्रा कमिटीने परिश्रम घेतली.

error: Content is protected !!