August 8, 2025

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे क्रांतीसुर्य, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली व मार्गदर्शन केले.उपस्थित विद्यार्थ्यांकडून विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली, नीती विना गता गेली, गतिविना वित्त गेले,वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.याचे पाठांतर करून घेतले व बक्षिसे देण्यात आली.सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सहशिक्षक धनंजय गव्हाणे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनिषा पवार, सुरेखा भावले, सरोजिनी पोते यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!