February 8, 2026

‘शुद्ध बुद्ध जगा,कुशल कर्मातच सौख्य’ – राहुल गायकवाड

  • लातूर – श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्ट संचालित श्रावस्ती बुद्ध विहारात आज (रविवार) धम्म दिवस व वर्षावासातील रविवार भारतीय बौद्ध महासभेच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगल धायगुडे होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राहुल गायकवाड, सरोजा सातपुते व सुनीता भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांना धूप,दीप,पुष्प अर्पण करून करण्यात आली.सामुदायिक बुद्ध वंदना प्रतिभा सावळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली,तर धम्मग्रंथ वाचनही त्यांच्या हस्ते पार पडले.पाहुण्यांचे स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आले.

  • यावेळी तालुका अध्यक्षा सुनीता भालेराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “धम्म आचरण केल्याने जीवन धन्य आणि समृद्ध होते.” तर राहुल गायकवाड यांनी प्रवचनातून “शुद्ध बुद्ध जगा, दिखावा करू नका. कुशल कर्मातच खरे सौख्य आहे,” असा मोलाचा संदेश दिला.
    खिरदान अनुसया कांबळे यांनी केले, तर केळी वाटप प्रतिभा सावळे यांच्या वतीने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन श्रावस्ती बुद्ध विहाराचे सचिव विलास कांबळे (घारगावकर) यांनी केले. शेवटी धम्म पालन गाथेने सांगता करण्यात आली.
    या कार्यक्रमाला विष्णू क्षीरसागर, बळीराम सूर्यवंशी,मोतीराम कांबळे,प्रभाकर करवंजे,विष्णू सवाई,शिवकांता सवाई,पुष्पा गायकवाड,विजया सरवदे, ज्योती घारगावकर, छाया भोसले, महादेवी वाघमारे, अर्चना माने, सरस्वती, सोजरबाई कांबळे आदींसह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.
error: Content is protected !!