August 10, 2025

सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन अर्थात खऱ्या शिक्षक दिनानिमित्त….

शिक्षक हा समाजाच्या दृष्टीने जबाबदार घटक असतो म्हणून आदर्श सन्मान हा त्यांचाच होऊ शकतो.शिक्षकांना शिक्षक म्हणून आपल्या जबाबदारीचे भान असते.राष्ट्रपितामह जोतिराव फुले यांनी विना मानधन ज्ञान प्रसाराचे कार्य केले. बहुजन समाजाच्या मुक्तीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व सुद्रातीशूद्र आणि स्त्रियांसाठी शाळा काढून त्यांना ज्ञानप्रक्रियेशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.शिक्षक विद्वान,नीतिमान,
सदवर्तनी,चांगले संस्कार करणारा,विद्यार्थी हिताची काळजी वाहणारा,जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता, गरीब श्रीमंत, लहान-मोठा भेद न पाळणारा असावा. हुकूमशाही वृत्तीचा व परधर्म द्वेष करणारा नसावा.भ्रष्टाचारी तर मुळीच नसावा.समतेचा पुरस्कार करणारा असावा.क्रांतीसुर्य राष्ट्रपितामह जोतिराव फुले या सर्व कसोट्यांवर खरे उतरतात म्हणून समतावादी व मानवतावादी व्यक्ती तथा समाज त्यांचा स्मृतिदिन अर्थात 28 नोव्हेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात व ते करणे उचितच आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई-वडिल, आणि निसर्गानंतर गुरुचे स्थान असते.अर्थात प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.शिक्षक आपली जडणघडण करतात, आपल्याला दिशा देतात, मार्गदर्शन करतात, आपल्यातील सुप्त सामर्थ्याचा शोध घेऊन आपल्यामध्ये विविध प्रकारचे मूल्य आणि संस्कार रुजवतात.हे करत असताना तो कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नाही.तर खरा शिक्षक जात,धर्म, पंथ,लहान मोठा,गरीब श्रीमंत यांच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून आपल्या विद्यार्थ्यांना जीवन जगण्यास सक्षम करत असतो आणि हे सर्व शिक्षक समर्पण वृत्तीने करत असतो.
जे शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांप्रती आणि समाजाप्रती निष्काम भाव ठेवत समर्पण वृत्तीने कार्य करतात तेच खरे शिक्षक असतात आणि या दृष्टिकोनातून विचार जर केला तर राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा
जोतिबा फुले हेच खरे निष्काम शिक्षक ठरतात. म्हणूनच त्यांच्या व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन!
आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे आपण या दिनी आपण ज्यांच्यामुळे घडलो,पायावर उभे राहिलो अर्थात सक्षम झालो अशा आई वडील, गुरुजन आणि आपल्या तमाम शिक्षकांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत त्यांना शुभेच्छा द्याव्यात,अभिवादन करावे त्यांचे ऋण व्यक्त करावेत व सदैव त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करत त्यांच्याप्रती आदरभाव जपावा ही नम्र विनंती.
मानवतावादी व विज्ञानवादी समाज बांधवांना नम्र आवाहन आहे की आपण राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी प्रत्येकाने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या समग्र वाङ्मयाचे वाचन करावे तथा त्यातील जास्तीत जास्त विचार समजून घेऊन कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करावा हीच खरी क्रांतीसुर्य महात्मा
जोतिबा फुले यांना खरीखुरी आदरांजली ठरेल…
राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

  • आपलाच निस्सीम सेवक…….
  • – संतोष प्रभु भोजने
    जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ धाराशिव.
    8208517172
error: Content is protected !!