धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 154 कारवाया करुन 1,10,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.25.11.2023 रोजी 18.54 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा.चंदाबाई अनंत चव्हाण यांचे घरासमोर साठे नगर धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)श्रीकांत अनंत चव्हाण, वय 34 वर्षे,रा. कुंभारीता. दक्षिण सोलापूर, ह.मु. साठे चौक धाराशिव, 2) भुजंग मधुकर काळे, वय 30 वर्षे, रा. साठे चौक धाराशिव, 3)चंद्रामणी तानाजी बनसोडे, वय 55 रा. भिमनगर धाराशिव, 4) सुभाष भगवान पवार, वय 43 वर्षे, रा. जुना साठे चौक धाराशिव, 5) करण संजय पवार, वय 20 वर्षे, रा. इंजिनीअरींग कॉलेज धाराशिव, 6) सखाराम सिमाराम काळे, वय 54 वर्षे रा. साठे चौक, धाराशिव ता. जि. धाराशिव हे सर्वजन 18.54 वा. सु. चंदाबाई अनंत चव्हाण यांचे घरासमोर साठे नगर धाराशिव येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह दोन मोटरसायकल व मोबाईल असा एकुण 1,73,890 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)आकाश गुंडु पांचाळ, वय 28 वर्षे, रा. चिंचोली जहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 12.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1455 हा एनएच 65 रोडवर बस स्थानक उमरगा समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. 2)सुभाष पंडु हाडोळे, वय 42 वर्षे, रा.बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 12.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 922 हा एनएच 65 रोडवर सोलापूर हैद्राबाद रोडवर उमरगा बस स्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)शिकुर मशाक शेख, वय 48 वर्षे, रा. अचलेर, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 23 एक्स 0982 हा आचलेर ते आलुर जाणारे रोडवर छत्रपती संभाजी महाराज चौक अचलेर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 2)रफीक लाडले मशाक मुल्ला, वय 40 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 13.55 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 1125 हा बेंळब ते मुरुम जाणारे रोडवर बेळंब बस स्थानक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अर्जुन सुरेंद्र म्हैपत्रा, वय 21 वर्षे, रा.लक्ष्मीनारायण कंपनी तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.26.11.2023 रोजी 21.20 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 13 एपी 5536 ही तामलवाडी गावातील बोगद्याजवळ मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
तामलवाडी पोलीस ठाणे : कुंभारी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथील- इंद्रजित मल्लीकार्जुन शिंदे, वय 21 वर्षे यांनी दि. 26.11.2023 रोजी 12.10 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्रं. एम.एच.13 सीटी 9077 हा तुळजापूर ते सोलापूर जाणारे एनएच 52 रोडवर टोलनाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये तामलवाडी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आह.
“ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)बजरंग बालाजी मुळे, वय 23 वर्षे, रा. बामणी ता.जि. धाराशिव, 2) रामलिंग सोमनाथ बिडवे, वय 48 वर्षे, रा. बामणी ता. जि. धाराशिव या दोघांनी दि.26.11.2023 रोजी बामणी ते ताकविकी जाणारे रोडचे दक्षिण व उत्तर बाजूस आरोपी नामे- 3) काशीनाथ शिवाजी सुरवसे, वय 37 वर्षे, रा. बेंबळी ता.जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. बेंबळी ते धाराशिव जाणारे रोडचे दक्ष्णि बाजूस वेगवेगळ्या तीन ठिकाणी रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- महेश दादाराव देवकते, वय 56 वर्षे, रा. बारुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव ह.मु. प्लॉट नं 35 निवेसी पार्क 02 डी. पी. रोड सांघवी नगर औंध पुणे यांचे बारुळ शिवारातील शेतातील विहीरवरील पाणबुडी मोटार 05 एच पी अंदाजे 15,600₹ किंमतीची ही दि. 19.11.2023 रोजी 14.00 ते दि. 21.11.2023 रोजी 11.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश देवकते यांनी दि.26.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : पोहनेरच्या ग्रामसचिव- आयोध्या शंकर शिंदे, वय 47 वर्षे, रा. तडवळा ता. जि. धाराशिव ह.मु.हनुमान चौक बार्शी नाका, धाराशिव या दि.24.11.2023 रोजी 18.30 ते 19.00 वा. सु. पोहनेर येथे मुक्कामी गेलेले ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ या शासन सुचित कार्यक्रमाची एल.ई.डी. व्हॅन क्र एमएच 13 आर 2369 ही सुशिलादेवी कॉम्पलेक्स पोहनेर येथे उभी असताना सदर व्हॅन वरील डिजीटल जाहीरातीचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडून शासनाचे नुकसान करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन आयोध्या शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 427 अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
शिराढोण पोलीस ठाणे : मयत नामे- बाळासाहेब साहेबराव शितोळे, वय 50 वर्षे, नायगाव, ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 26.10.2023 रोजी 22.15 वा. सु. नायगाव ते मुरुड रस्त्यावर जाणारे लोकनायक कॉलेज नायगाव येथुन मोटरसायकल यमाहा क्रुक्स् विना नंबरची हीवर बसून जात होते. दरम्यान पिकअप क्र एमएच 24 एयु 9402 च्या चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे राँग साईडने चालवुन बाळासाहेब शितोळे यांचे मोटरसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या आपघातात बाळासाहेब शितोळे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- रामदास साहेबराव शितोळे, वय 49 वर्षे, रा. नायगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) सुग्रीव दासु काळे, 2) प्रमोद बाबु काळे, 3) विलास अरुण हांडे, 4) संगिता विलास हांडे सर्व रा. भानसगाव ता.जि. धाराशिव यांनी दि. 25.11.2023 रोजी 17.30 वा. सु. भानसगाव येथे विठ्ठल रुक्मीणीचे मंदीराचे समोर फिर्यादी नामे- सागर विष्णु काळे, वय 29 वर्षे, रा. भानसगाव ता. जि. धाराशिव यांना तळ्यातील मोटारी शासकीय लोकांना का दाखविल्या या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, दगडाने व लोखंडी साखळीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सागर काळे यांनी दि.26.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी