कळंब – येथील ऋतिक पटेकर यांच्या मनात बसली ग…या नवीन गाण्याच्या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऋतिक पटेकर यांनी यापूर्वी अनेक गाण्याचे अल्बम प्रकाशित केले आहेत. त्यांनी गायलेली व लिहिलेली गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. या अल्बमचे प्रकाशन अंजली पटेक र, मोहन पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेश साबळे, नायिका समृद्धी जमादार, दीलबरा ग तु माझी दिलबरा फेम किशोर जावळे,राहुल हौसलमल आदी उपस्थित होते. यावेळी गायक ऋतिक पटेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. रसिकांनी माझ्या सर्व गाण्याला पसंती द्यावी, असे आवाहन ऋतिक पटेकर यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी