September 21, 2026

शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा (ता. भूम) येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी (वार गुरुवार) अभिवादन कार्यक्रम पार पडला.
    या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक नामदेव अनंत्रे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष,शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,शशिकांत मांजरे, सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव, बबन यादव तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!