February 9, 2026

श्री शिवशंकर गणेश मंडळाकडुन संत गोरा कुंभाराची भक्ती दर्शकांना खेळवून ठेवणाऱ्या लघुनाटिकेचे सादरीकरण

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब येथील जुना सराफा लाईन विठ्ठल मंदिर समोरील श्री शिवशंकर गणेश मंडळांने संत गोरोबा कुंभाराची भक्ती (लघु नाटिका )जिवंत देखावा सादर केला असून यातून मराठवाडा ही संताची पवित्र भूमी आहे.या भूमीतून धाराशिव जिल्हा तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका हे आपले परंपरेने मडके बनविण्याचे कुंभाराचे काम करीत असताना त्यांनी सतत विठ्ठलाचे नामस्मरण केले व त्यांच्या या भक्तीतून अभंग रचना झाली, संत गोरोबा कुंभार विठ्ठलाच्या भक्तीत रममान होत आपले देहभान विसरत असत , एके प्रसंगी संत गोरोबा कुंभार मडके बनविण्यात व विठ्ठल नाम स्मरणात रममान होते होते व त्याप्रसंगी संत गोरोबा काका यांची पत्नी संताईने हिने त्यांचे लहान बाळ गोरोबाकाका पाशी खेळण्यास सोडले व त्याकडे लक्ष देण्यास सांगून घरात परतली,संत गोराबा कुंभार चिखल तुडविण्यात इतके मग्न झाले होते की संताईने त्यांच्या पाशी सोडलेले लहान बाळ रांगत ,रांगत पायापाशी, चिखलात कधी आले हे कळालेच नाही व विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या संत गोरोबा कुंभार यांनी हे बाळ चिखलाबरोबर आपल्या पायाने तुडविले हे कथानक या लघुनटिकेच्या असून पुढे संत गोरोबाकाका यांच्या पत्नी संताई हिने विठ्ठलाच्या देवपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता विठ्ठलाने मुलं परत जिवंत केले या देखाव्यातून भक्ती परंपरेची महानता अधोरेखित होत आहे.
  • लघुनाटिका जिवंत देखाव्यातील
    कलाकार समीक्षा संगमेश्वर बीदरकर,(संताई, संत गोरा कुंभार यांची बायको) व समवेल संगमेश्वर बीदरकर,( संत गोरा कुंभार )हे प्रमुख कलाकार असून नाटिकेतील कलाकार यांनी नाटिकेतील भूमिका व अभिनय मोठ्या ताकदीने सादर केला आहे. देखाव्यातला जिवंतपणा अधोरेखित होत आहे,श्री शिवशंकर गणेश मंडळाच्या या देखाव्याचे उद्घाटन दि.४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी कळंब -धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना नेते संजय मुंदडा,तालुका प्रमुख सचिन काळे,जिल्हा उपप्रमुख, प्रदीप मेटे,शहर प्रमुख विश्वजीत जाधव यांची उपस्थिती होती . आमदार कैलास (दादा) घाडगे पाटील यांच्या हस्ते श्री गणपतीची आरती करण्यात आली.श्री शिवशंकर गणेश मंडळाचे हे ६२ वे वर्ष असून गणेश मंडळाकडून प्रतिवर्षी समाज प्रबोधन पर तसेच पौराणिक,ऐतिहासिक,देखावे सादर केले जातात गेली पाच वर्षापासून मंडळाकडून (जिवंत देखावा) लघु नाटिकेच्या माध्यमातून विविध विषयाचे सादरीकरण होत आहे,गणेश उत्सवातून हा वेगळेपणा मंडळाने जोपासला आहे यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत यामध्ये अध्यक्ष – वेदांत हुलसुरकर,उपाध्यक्ष प्रसन्न हुलसुरकर,मयूर लोखंडे,पवन वेदपाठक,अतुल पाटील,राहुल दीक्षित यांचा समावेश आहे.
error: Content is protected !!