February 8, 2026

जय भवानी विद्यालय पारा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • पारा – दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी, गुरुवार,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    हा कार्यक्रम ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय,पारा (ता. वाशी) येथे पार पडला.
    कार्यक्रमास मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक शिक्षक संदीप भराटे,श्रीमती शितल मेटे,सतीश वाघमारे,दीपक मुरकुटे,विकास माळी,अमोल बांगर,दीपक मुळे,शहाजी सोलंकर,अमोल गवळी,तुषार डमरे व अतुल गवळी यांची उपस्थिती लाभली.यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!