May 11, 2026

आशू फाउंडेशनतर्फे कारसा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

  • लातूर – आशू फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कारसा (जि.लातूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
    या उपक्रमास संस्थापक अध्यक्ष अमर घोडके,सहाय्यक शिक्षक कुमार साळुंके,प्रेम पवार,बेद्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते गुणवंत सरवदे,दत्ता सरवदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
    या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत मदतीचा हात मिळाल्याने पालक व शिक्षक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!