मोहा ( प्रविण कसबे यांजकडून) –
कळंब तालुक्यातील मोहा येथील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा गावात भव्य सत्कार करण्यात आला.
दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू झाले होते. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा समाजबांधवांनी उपस्थिती दर्शवली.
पाच दिवसांच्या उपोषणानंतर अखेर महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेटला मान्यता दिली.मराठा उपसमिती मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन मान्यताप्राप्त कागद सुपूर्द केले.त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आणि मागण्यांची पूर्तता झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून परतलेल्या मोहा गावातील मराठा कार्यकर्त्यांचा गावात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली,फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यास समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
More Stories
ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके