February 8, 2026

ग्रामीण विद्यार्थ्यांची जागतिक झेप!

  • परिवर्तन मिशन फाऊंडेशनचे पाच विद्यार्थी JLPT परीक्षेत यशस्वी
  • पुणे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी परकीय भाषा आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या जागतिक करिअरच्या संधींचे दालन उघडण्याचे कार्य परिवर्तन मिशन फाऊंडेशन सातत्याने करत आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून जपानी भाषा परीक्षेत (JLPT – Japanese Language Proficiency Test) यंदा परिवर्तन मिशन फाऊंडेशनच्या ५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
  • या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये –
    सिद्धार्थ गायकवाड,पूजा सौदागर,विपश्यना गावंडे,जान्हवी दांडगे,सम्यक गोपनारायण यांचा समावेश आहे.
    ही आंतरराष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील हे विद्यार्थी आता जपानमध्ये उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी साधू शकतील.
    संस्थेचे संस्थापक किशोर भगत यांनी सांगितले की,“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा जागतिक संधींचा फायदा करून आपले भवितव्य घडवावे. परिवर्तन मिशन फाऊंडेशनच्या प्रयत्नांमुळे आता अनेक ग्रामीण तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व माहिती उपलब्ध होत आहे.”
    आज ग्रामीण परिसरातील पाच विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली छाप उमटवत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
    अधिक माहितीसाठी व मोफत परदेशी भाषा प्रशिक्षणासाठी भेट द्या : 👉 www.parivattan.org असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!