February 8, 2026

शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचा ३४ वा स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब व शि.म.ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या ३४ व्या स्मृतीदिनानिमित्त शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    या प्रसंगी दुपारी १२:३० वाजता गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल मोहेकर (अध्यक्ष,ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा) भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उध्दव भोसले (कुलगुरु,संजय घोडावत विद्यापीठ,कोल्हापूर) उपस्थित राहणार आहेत.
    तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रकाश पवार (विचारवंत,लेखक व वक्ते, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) लाभणार आहे.
    या दिवशी सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात सा.साक्षी पावनज्योतचा पुण्यस्मरण विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत भोजन होणार असून हा कार्यक्रम सांस्कृतिक सभागृह,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे होणार आहे.
    या कार्यक्रमाला समाजातील नागरिक,माजी विद्यार्थी,स्थानिक मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
error: Content is protected !!