कळंब – कळंब शहरामधील शासकीय तसेच गायरान जमिनीवर उभारलेली घरे,जागा व पत्र्याची शेडे यांना नियमित करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार तसेच पालकमंत्री धाराशिव यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शहरातील अनेक कुटुंबे शासकीय व गायरान जमिनीवर कष्टाने घरकुले बांधून राहतात.ही घरे गरीब व मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची उपजीविका आहेत.त्यामुळे या कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 21 नुसार अतिक्रमणे नियमित करून घरकुलासाठी जमीन मंजूर करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर शशिकांत बप्पाजी निरपळ,वाजिद काजी,रेवन करंजकर,बबन हौसलमल,रोहित कसबे,सिद्धेश्वर खरमुडे,विशाल वाघमारे,मुजाहिद सय्यद,अरविंद हजारे,प्रभू गायकवाड आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी