August 8, 2025

विद्यापीठ उपपरिसरात “संविधान दिवस” साजरा

  • धाराशिव- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद,गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना घटनासभेत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची घटना भेट दिली.राज्य घटनेशी बांधील राहणे हे पहिले मुलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीत याबद्दल सन्मान बाळगला पाहिजे. मूलभूत कर्तव्य पार पाडले पाहिजेत.घटनेची उद्दिष्टे आणि संस्थांचा आदर केला पाहिजे, सार्वभौमत्वाचे रक्षण, देशाचे ऐक्य व एकात्मता, देशाचे संरक्षण,सलोखा व बंधुभाव वाढविणे, मानवता,करुणा आणि परिवर्तन विषयी आदर, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण,हिंसाचारापासून दूर राहणे हि काही मूलभूत कर्तव्य आहेत. प्रगल्भ नागरिक व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिक हिताला जास्त महत्व देतात.
    विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांचे हस्ते यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
    उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण केले.यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटिल, कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ.गोविंद कोकणे,नाट्यशास्त्र व लोककला विभागातील डाॅ. गणेश शिंदे, वरिष्ठ सहाय्यक श्रीकांत सोवितकर, विठ्ठल कसबे, शिवदास वाघमारे,अनिल वाघमारे,राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. राजयघटने विषयी बांधिलकी व्यक्त करण्यात आली.यावेळी शिक्षक, कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!