August 8, 2025

प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने संविधान दिन साजरा

  • कळंब – संविधान दिनानिमित्त प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी कळंब शहरातील गणेश चित्रमंदीर रोडवरील साक्षी कोचिंग क्लासेस येथे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व्हॉईस ऑफ मिडीयाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे,समृद्ध समाज फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हावळे व ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    २ वर्षे ११ महिने १८ दिवस अतिश्रमाने प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला आदर्शवत असलेली संविधानाची निर्मिती केली.
    याप्रसंगी संघर्ष घोडके,उत्कर्ष घोडके व व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!