February 8, 2026

विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे सद्भावना दिन उत्साहात साजरा

  • स्व. राजीव गांधी यांना अभिवादन – शिक्षिका निर्मला वाघमारे यांचा सत्कार
  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव शिक्षणतज्ञ डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे माजी पंतप्रधान आणि तंत्रज्ञानाचे जनक स्व.राजीव गांधी यांचा जन्मदिन सद्भावना दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे सद्भावना प्रतिज्ञा घेतली.

  • यावेळी शिक्षक अभियोग्यता परीक्षेत विद्यालयातील मराठी विषयाच्या शिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे यांनी २०२५-२६ मध्ये २०० पैकी ७४ गुण मिळवून पात्रता प्राप्त केली.त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
    या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!