लातूर – लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या जिजामाता विद्यालयात भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास संशोधक व विचारवंत विवेक सौताडेकर यांनी उपस्थिती लावली.त्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव गायकवाड,डॉ.ज्ञानेश्वर चिंते,संचालिका संजनाताई काळे, प्राचार्य देविदास कोल्हे,विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय मुंडे,प्रा.बाबासाहेब सोनवणे,पूजा मोरे,मुख्याध्यापिका साविजेता खंदारे, डॉ.अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते,संगीतमय कवायत, कराटे प्रात्यक्षिक, ठोकळ्यांची कवायत व “मी भारत माता बोलतेय” या एकपात्री नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनी कु. सुनिता भोसले, चि. विवेक भोसले, श्रेया वाघमारे, शर्वरी साबळे, प्राची पवार, पंचशीला पोरे यांनी स्वातंत्र्याचा इतिहास व नव्या भारताविषयी मनोगते व्यक्त केली. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबासाहेब सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती भाग्यशाली गुडे यांनी तर आभार श्रीमती वैशाली वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार शिंदे,शंकर पांचाळ, गोकुळ मतकंटे, प्रा.अरविंद पदातुरे,सुधीर बाळापुरे,वैशाली फुले,सविता राठोड,वर्षा येलमटे, शंकर दुरुगकर,गणेश मेकाले, बालाजी साबळे,आप्पासाहेब देशमुख,बालाजी पवार व अर्जुन कांबळे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग