March 26, 2026

७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या क्रीडांगणावर सकाळी ७.४५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    प्रथमतःराष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
    तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते संपन्न झाले.
    याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे,सोनाली ढमाले तसेच छात्राध्यापकांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!